बील न भरल्याने मायावती यांच्या भावाच्या घराचे वीज कनेक्शन कापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 14:24 IST2020-02-13T14:22:05+5:302020-02-13T14:24:10+5:30

मायावती याचं गाव असलेल्या बादलापूर येथील घराचे तब्बल 67 हजार रुपये वीज बिल थकले होत.

mayawati brother electricity connection cut | बील न भरल्याने मायावती यांच्या भावाच्या घराचे वीज कनेक्शन कापलं

बील न भरल्याने मायावती यांच्या भावाच्या घराचे वीज कनेक्शन कापलं

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाच्या अध्याक्षा मायावती यांच्या कुटंबाने वीज बिलाची रक्कम थकवल्याने, वीज विभागाने त्यांच्या घराची वीज कापली आहे. वीज बिल थकीत असल्याची नोटीस देऊनही बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती याचं गाव असलेल्या बादलापूर येथील घराचे तब्बल 67 हजार रुपये वीज बिल थकले होत. वीज विभागाने बील भरावे म्हणून अनेकदा नोटीस ही पाठवल्या होत्या. मात्र तरीही हे बिल भरण्यात आले नव्हते. त्यामुळे अखेर मंगळवारी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी बादलापूर येथील गौतम बुद्ध नगरमध्ये असलेल्या मायावतींच्या घराचे वीज कापली. तर हे वीज कनेक्शन मायावती यांचे भाऊ आनंद कुमार यांच्या नावावर आहे.

वीज विभागाने कनेक्शन कापताच दुसऱ्यादिवशी आनंद कुमार यांनी 50 हजार रुपये भरले. त्यामुळे वीज विभागाने सुद्धा त्यांचे विजेचे कनेक्शन पुन्हा जोडून दिले आहे. विशेष म्हणजे वीज कनेक्शन कट करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता.

 

 

 

 

 

 

Web Title: mayawati brother electricity connection cut