उत्तर प्रदेशातील बरेली शहरात २६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी 'आय लव्ह मुहम्मद' कॅम्पेनच्या नावाखाली घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, असा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. FIR नुसार, इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचा प्रमुख मौलाना तौकीर रझा खान हा या घटनेतील मुख्य आरोपी आहेत. आज शहराचे वातावरण खराब कारयचे, त्यासाठी पोलिसांवर हल्ला करून त्यांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, मुस्लिमांची शक्ती दाखवायची आहे, असे निर्देश त्याने निदर्शकांना दिले होते.
या कटात सहभागी असलेल्या ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून, १० एफआयआरमध्ये २,००० हून अधिक लोकांचा उल्लेख आहे. हिंसाचारात १० पोलिस जखमी झाले, तर शहरात ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.
शुक्रवारच्या नमाजनंतर आला हजरत दरगाह आणि तौकीर रझांच्या घराजवळ शेकडो निदर्शक जमले होते. ते 'आय लव्ह मुहम्मद'चे पोस्टर्स घेऊन मोर्चा काढण्याचा तयारीत होते. मात्र, प्रशासनाने परवानगी नाकारल्याने तो रद्द करावा लागला. यावेळी जमावातील काही लोकांनी 'गुस्ताख-ए-नबी की एकही सजा, सर तन से जुदा' सारख्या उग्र घोषणा दिल्या. यामुळे वातावरण बिघडले. यानंतर जमावाने सरकार विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात कली. यानंतर, कोतवाली, अलमगीरपूर, सिव्हिल लाइन्स, बडा बाजार आणि बनसमंडी भागात दुकाने बंद पाडण्यात आली. वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.
एफआयआरनुसार, तौकीर रझा, त्यांचे सहकारी नदीम आणि इतरांनी कट रचला. जमावाने पोलिसांवर अवैध शस्त्रांनी हल्ला केला. यामुळे त्यांचा हेतू जीवघेणाच असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांच्या काठ्या हिसकावल्या, वर्दीचे बॅच तोडले, पेट्रोल बॉम्ब फेकले यामुळे अनेक पोलीस भाजले. धारदार शस्त्रांनीही हल्ला करण्यात आला. परिणामी १० पोलिस गंभीर जखमी.
हिंसेनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालवले, ज्यात घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे मिळाली. डीआयजी अजय कुमार साहनी यांनी याला पश्चिम यूपीतील शांतता भंग करण्याचा आणि राज्याच्या विकास योजनांना खिळ लावण्याचा डाव म्हटले आहे. बरेली एसएसपी अनुराग आर्य म्हणाले, तौकीर रझा व इतर ८ आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. ९०-९५ टक्के लोक शांत होते, पण उपद्रवींनी कायदा सुव्यवस्था बिघडवली.
Web Summary : Bareilly violence, planned under 'I Love Muhammad' campaign, names Maulana Tauqeer Raza in FIR. Demonstrators, instructed to attack police, clashed, resulting in injuries and arrests. Illegal weapons were recovered, disrupting peace.
Web Summary : 'आई लव मुहम्मद' अभियान के तहत बरेली में हिंसा की योजना बनाई गई, एफआईआर में मौलाना तौकीर रजा का नाम। प्रदर्शनकारियों को पुलिस पर हमला करने के निर्देश दिए गए, झड़प में चोटें आईं और गिरफ्तारियां हुईं। अवैध हथियार बरामद, शांति भंग।