समाजवादी पार्टीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 14:51 IST2020-01-12T14:02:00+5:302020-01-12T14:51:00+5:30

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे.

Mau: SP leader Bijli Yadav shot dead in Muhammadabad | समाजवादी पार्टीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या, परिसरात खळबळ

समाजवादी पार्टीच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या, परिसरात खळबळ

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मऊमध्ये रविवारी सकाळी समाजवादी पार्टीचे (सपा) नेते बिजली यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहम्मदाबाद परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर अज्ञात हल्लेखोर फरार झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिजली यादव सकाळी फिरायला गेले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ  उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. दरम्यान, बिजली यादव यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या शेवटी उत्तर प्रदेशमधील पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, त्याची तयारी बिजली यादव करत होते. स्थानिकांच्या मते राजकीय शत्रुत्वातून ही हत्या करण्यात आलेली आहे.

Web Title: Mau: SP leader Bijli Yadav shot dead in Muhammadabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.