'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:10 IST2025-09-05T18:04:33+5:302025-09-05T18:10:22+5:30
ज्या कर्मचाऱ्यांचे पालक किंवा सासू-सासरे नाहीत त्यांना या विशेष रजा मिळणार नाहीत.

'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
आसामसरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २ दिवसांची विशेष कॅज्युअल रजा देण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवू शकतील. सरकारच्या अधिसूचनेनुसार, ही रजा १४ आणि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी 'मातृ-पितृ वंदना' योजनेअंतर्गत दिली जाईल. पंरतु, या रजेसाठी कर्मचाऱ्यांना विहित पोर्टलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे.
Under the 'Matri Pitri Vandana' scheme, Assam Govt has announced special casual leave on 14-15 Nov 2025, encouraging employees to cherish time with parents and in-laws. pic.twitter.com/f2J93Q578E
— Chief Minister Assam (@CMOfficeAssam) September 5, 2025
आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी २०२१ मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या पहिल्या भाषणात ही योजना जाहीर केली होती. अधिसूचनेत म्हटले आहे की, "आसामचे राज्यपाल 'मातृ-पितृ वंदना' योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना १४ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) आणि १५ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) रोजी विशेष कॅज्युअल रजेची घोषणा करताना आनंद होत आहे. यासोबतच, अधिसूचनेत असेही नमूद केले आहे की, कर्मचारी या योजनेअंतर्गत १६ नोव्हेंबर (रविवार) ची रजा देखील या सुट्ट्यांसह एकत्र करू शकतात.
'या' कर्मचाऱ्यांना रजा नाही
ही विशेष रजा देण्यामागील उद्देश असा आहे की, कर्मचारी त्यांच्या वृद्ध पालकांसोबत किंवा सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवू शकतील. त्यांचा आदर करता येईल आणि त्यांची काळजी घेतली जाऊ शकेल. कर्मचारी त्यांच्या मनोरंजनासाठी या रजा घेऊ शकणार नाहीत. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांचे पालक किंवा सासू-सासरे नाहीत त्यांना या रजा मिळणार नाहीत.