शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून मामाचा भाच्याकडून खून

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

औरंगाबाद : जटवाडा शिवारात जमिनीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाच्याकडून मामाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

औरंगाबाद : जटवाडा शिवारात जमिनीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाच्याकडून मामाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विश्वास आसाराम शिंदे (५८, रा. सिडको एन-३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत आरोपी संजय शंकर भालेकर (४०, रा. ओव्हर) हे जखमी झाले आहेत. याविषयी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत आणि आरोपी यांच्यात मामा-भाचे असे नाते आहे. विश्वास शिंदे यांची जटवाडा शिवारात जमीन आहे. या जमिनीशेजारी आरोपीची जमीन आहे. त्यांच्यात जमिनीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांचा हा वाद तंटामुक्त समितीपर्यंत गेला होता, त्यावेळी पाच गुंठे जमीन संजयला देण्याची तयारी विश्वास शिंदे यांनी दर्शविली होती. मात्र, त्यानंतरही संजय यांना जमीन मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढत गेला. दरम्यान, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिंदे हे शेतात गेले होते. दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास आरोपीसोबत त्यांचे भांडण सुरू झाले. त्यांच्यात आपसात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोघेही जखमी झाले. मात्र, शिंदे यांना गंभीर दुखापत झाल्याने भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी त्यांना घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना सायं. ४.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तर संजय हे हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांना काही वेळ ठाण्यात बसवून शांत केले आणि नंतर मेडिकल मेमो देऊन घाटीत पाठविले.
संजय हे घाटीत आल्यानंतर तेथे त्यांना शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे समजले. तेथून ते फरार झाले. दरम्यान, ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी त्यास रात्री उशिरा पकडून ठाण्यात आणले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.