लखनौ - सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागच्या मुख्य सुत्रधाराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या दंगलीप्रकरणी आतापर्यंत 75 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दंगलीतील मुख्य सुत्रधारासह तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या मुख्य सूत्रधाराचे नाव योगेश राज असून, तो प्रवीण तोगाडिया यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याच्यावर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना भडकवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये योगेश राज याचे नाव आहे. योगेश राज याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून जमावाला भडवले, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. योगेश राजसोबत उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल ( माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची नावेही पोलीस अधिकारी सुबोध सिंह यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये आहेत. दरम्यान, देवेंद्र, चमन आणि आशीष चौहान यांना अटक करण्यात आली आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली होती.
बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मास्टरमाइंड अटकेत, आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 12:50 IST
सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागच्या मुख्य सुत्रधाराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मास्टरमाइंड अटकेत, आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित
ठळक मुद्देसोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागच्या मुख्य सुत्रधाराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. दंगलीतील मुख्य सुत्रधारासह तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या मुख्य सूत्रधाराचे नाव योगेश राज असून, तो प्रवीण तोगाडिया यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. योगेश राजसोबत उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल ( माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची नावेही पोलीस अधिकारी सुबोध सिंह यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये आहेत.