बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ; 10 वाहनांची जाळपोळ, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 12:51 IST2018-12-30T11:46:38+5:302018-12-30T12:51:21+5:30
बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे.

बिहारमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ; 10 वाहनांची जाळपोळ, एकाचा मृत्यू
पाटणा - बिहारच्या औरंगाबादमध्ये नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी 4 बसेस जाळल्या असून एकाची गोळी झाडून हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. आमदार राजन सिंह यांचे चुलते नरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
औरंगाबादच्या देव येथील गोदाम परिसरात काही नक्षलवाद्यांनी ट्रान्स्पोर्टरच्या दोन घरांवर हल्ला केला. तसेच 4 बसेससहीत 6 वाहनांना आग लावली. नक्षलवाद्यांनी शंभरहून अधिक राऊंड गोळीबार केला. पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. गोळीबारानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Bihar: Naxals torched four buses and shot dead one person in Dev, in Aurangabad, last night; CRPF and district police present at the spot pic.twitter.com/qg8g4n24yT
— ANI (@ANI) December 30, 2018