सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 13:19 IST2022-12-22T13:18:52+5:302022-12-22T13:19:26+5:30
आग लागल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला.

सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा
जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भारतीय लष्कराच्या ट्रेनला अचानक भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे ट्रेनमध्ये ठेवलेल्या आधुनिक ट्रक जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर लष्कराच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ट्रकसह इतर वस्तूही जळून खाक झाल्या.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्याचे मिळताच लष्कराचे जवान ट्रेनमधून खाली उतरले आणि आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. जवानांनी वेळीच आगीतून आपल्या मौल्यवान वस्तू वाचवली.
मात्र आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली. या आगीत लष्कराच्या जवानांचे बरेच सामान जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही