दिल्लीत गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग; ३५ मुली अडकलेल्या, सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 21:55 IST2023-09-27T21:55:11+5:302023-09-27T21:55:45+5:30
आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. हॉस्टेलमध्ये ३५ मुली होत्या.

दिल्लीत गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग; ३५ मुली अडकलेल्या, सुटका
दिल्लीच्या मुखर्जी नगरमधील एका गर्ल्स पीजी हॉस्टेलला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या पोहोचल्या होत्या. आगीने वेढल्याने काही मुली आतमध्ये अडकल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्यास यश आल्याचे दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले आहे.
आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. हॉस्टेलमध्ये ३५ मुली होत्या. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. पायऱ्यांजवळील मीटर बोर्डजवळ आग लागली होती, ती इमारतीत पसरली होती.
मुखर्जी नगर हा दिल्लीतील गजबजलेला परिसर आहे. येथे अनेक कोचिंग सेंटर्स आहेत जी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. प्राथमिक तपासात ही आग शर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.