शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 22:16 IST

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने परिस्थितीची माहिती घेतली.

देशाच्या राजधानीत सोमवारी सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ झालेला भीषण स्फोट अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ उभ्या असलेल्या ह्युंदाई आय२० कारमध्ये झालेल्या या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, अनेक जण जखमी आहेत. या घटनेनंतर केंद्रातील उच्च पातळीवर तातडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया

या भीषण स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, सायंकाळी ७ च्या सुमारास सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ हा स्फोट झाला, ज्यात काही पादचारी जखमी झाले आणि वाहनांचे नुकसान झाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "आज संध्याकाळी, अंदाजे ७ वाजता, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका ह्युंदाई आय२० कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात काही पादचारी जखमी झाले आणि काही वाहनांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवालांनुसार, काही लोकांचा जीव गेला आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यापासून १० मिनिटांच्या आत, दिल्ली क्राईम ब्रांच आणि दिल्ली स्पेशल ब्रांचचे पथक घटनास्थळी पोहोचले. एनएसजी आणि एनआयएच्या पथकांनी, एफएसएलसोबत मिळून, आता सखोल तपास सुरू केला आहे. आजूबाजूच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचचे प्रभारी यांच्याशीही बोललो आहे. दिल्लीचे आणि स्पेशल ब्रांचचे प्रभारी घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा शोध घेत आहोत आणि सर्व शक्यता विचारात घेऊन सखोल तपास करू. या प्रकरणाची त्वरित चौकशी केली जाईल आणि आम्ही लवकरच जनतेसमोर त्याचे निष्कर्ष सादर करू. मी थोड्याच वेळात घटनास्थळी आणि त्यानंतर तातडीने रुग्णालयात भेट देण्यासाठी रवाना होत आहे."

घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून दिल्लीतील परिस्थिती आणि तपासकार्याची माहिती घेतली.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने एलएनजेपी रुग्णालयात धाव घेतली आणि स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. स्फोटामुळे राजधानीत निर्माण झालेली ही दहशत आणि ११ जणांचा बळी घेतल्याच्या घटनेने देशाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Deadly car explosion near Red Fort; investigation ordered by Amit Shah.

Web Summary : A car bomb near Delhi's Red Fort killed eight. Home Minister Amit Shah ordered a thorough investigation involving NSG and NIA, examining all angles and CCTV footage. He visited the injured in the hospital. Prime Minister Modi also inquired about the situation.
टॅग्स :Amit Shahअमित शाहdelhiदिल्लीBlastस्फोट