शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक हत्याकांडाने लखनौ हादरले, आपल्याच कुटुंबातील 6 जणांची हत्या करून आरोपी पोहोचला पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 00:30 IST

अजय सिंह, असे संबंधित आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजीत पांडेय घटना स्थळी पोहोचले. ही घटना लखनौ-उन्नाव जिल्ह्याच्या सीमेजवळ घडल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीने सर्वप्रथम उन्नाव जिल्ह्यातील लखनौला लागून असलेल्या भागात आपल्या वडिलांची हत्या केली.

ठळक मुद्देविकलेल्या संपत्तीतून आलेल्या पैशांमध्ये आरोपी वाटा मागत होताआरोपीने सर्वप्रथम उन्नाव जिल्ह्यातील लखनौला लागून असलेल्या भागात आपल्या वडिलांची हत्या केलीपोलिसांनी आरोपीचा मुलगा अवनीश उर्फ अंकितलाही अटक केली आहे

लखनौ : लॉकडाउन सुरू असतानाच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सामूहिक हत्याकांडाने हादरली आही. येथील बंथरा भागात एका युवकाने आपल्याच कुटुंबातील 6 जणांची हत्त्या केली. यानंतर तो स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याला अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अजय सिंह, असे संबंधित आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुजीत पांडेय घटना स्थळी पोहोचले. ही घटना लखनौ-उन्नाव जिल्ह्याच्या सीमेजवळ घडल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीने सर्वप्रथम उन्नाव जिल्ह्यातील लखनौला लागून असलेल्या भागात आपल्या वडिलांची हत्या केली. नंतर त्याने लखनौ येथील बंथरा येथे आपली आई, भाऊ, भावाची बायको आणि त्याच्या दोन मुलांचीही हत्या केली. यानंर आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. पांडेय म्हणाले, आरोपीने हे हत्याकांड कशामुळे केले, यासंदर्भात चौकशी सुरू आहे. 

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात; राज्यपालांनी पाठवलं पत्र

मालमत्तेवरून सुरू होता वाद -बंथरा गुदौली गावात शेतकरी अमर सिंह आपल्या  कुटुंबासोबत राहत होते. त्यांनी जवळपास 20 वर्षांपूर्वीच मोठा मुलगा अजय सिंह याला कुटुंबापासून वेगळे केले होते. अमर सिंह यांच्यासह त्यांची पत्नी, एक मुलगा अरुण, सून रामसखी, नातू सौरभ आणि नात सारिका राहत होते. अनेक दिवसांपासून या पिता-पुत्रांमध्ये मालमत्तेचा वाद सुरू होता. आरोपी अजयचा गुरुवारीही वडील अमर सिंह आणि भाऊ अरुण यांच्याशी वाद झाला. विकलेल्या संपत्तीतून आलेल्या पैशांतही आरोपी वाटा मागत होता.

CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

भावाच्या कुटुंबाचीही हत्या -पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर सिंह हे उन्नाव बॉर्डरवर असलेल्या आपल्या शेतात काम करत होते. आरोपी अजय आणि त्याचा मुलगा अवनीश उर्फ अंकित शेतात अमरसिंह यांच्याकडे गेले. येथे त्यांचा वाद झाला. यात अमरसिंह यांचा मृत्यू झाला. यानंतर शेतातून काम करून परतत असलेला भाऊ अरुण सिंह, त्याची पत्नी रामसखी आणि त्यांच्या मुला-मुलींचीही अजयने हत्या केली. यानंतर त्याने घरी जाऊन आईलाही ठार मारले.

घटनेनंतर अजय स्वतःच बंथरा पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी त्याचा मुलगा अवनीश उर्फ अंकितलाही अटक केली आहे. या दोघांचीही चौकशी सुरू आहे.

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे