शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मसूद अजहरला अजित डोवाल यांनी दिली होती क्लिन चीट; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:34 IST

२०१०च्या मुलाखतीचा दिला दाखला

कंदाहार विमान प्रकरणात मुक्तता करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यावेळी क्लिन चीट दिली होती असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासाठी डोवाल यांनी २०१० साली दिलेल्या मुलाखतीचा आधार घेतला आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी एका भाषणात उपरोधिक शैलीत ‘मसूद अजहरजी' असा उल्लेख केला. त्यावरून त्यांच्यावर भाजपाने कडक टीका केली होती. राहुल गांधी यांच्या विधानांचा भाजप विपर्यास करत असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते. या पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, डोवाल यांनी जाणता-अजाणता गोपनीय गोष्टी या मुलाखतीत उघड केल्या होत्या. मसूद अजहरची मुक्तता करणे हा राजकीय निर्णय होता असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे मसूदची सुटका ही राष्ट्रविरोधी कृती होती असे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय विधीमंत्री रविशंकरप्रसाद यांनी मान्य करतील काय असा सवालही सुरजेवाला यांनी विचारला आहे.भाजपा सरकार कणखर का राहिले नाही?मसूद अजहर याला आयइडीचा स्फोट कसा करावा याचे अजिबात ज्ञान नाही, तो नेमबाजही नाही, मसूदची मुक्तता केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनात २०० टक्के वाढ झाली अशी विधाने डोवाल यांनी नऊ वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत केल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणी दहशतवाद्यांशी कोणतीही चर्चा करू नका, कोणापुढेही झुकू नका असे काँग्रेसप्रणित यूपीएचे धोरण होते. या सच्च्या राष्ट्रवादी धोरणाबद्दल डोवाल यांनी या मुलाखतीत काँग्रेसचे कौतुकच केले आहे असा दावाही सुरजेवाला यांनी केला. यूपीएसारखेच कणखर धोरण तत्कालीन भाजपा सरकारने कंदाहार विमान अपहरण प्रकरणात का स्वीकारले नाही असाही सवाल सुरजेवाला यांनी केला आहे.

टॅग्स :masood azharमसूद अजहरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदAjit Dovalअजित डोवाल