Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood declared terrorists under new UAPA law | मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई
मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई

नवी दिल्ली - भारताने 'बेकायदा कारवाया प्रतिबंध' (यूएपीए) कायद्यांतर्गत चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम व झकी-उर-रहमान लखवी या चार जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या मसूद अजहरचा या यादीत पहिला नंबर आहे. तर दहशतवादी संघटना 'जमात उद-दावा'चा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद दुसऱ्या क्रमांकावर आहे.

माफिया डॉन दाऊद इब्राहीम आणि दहशतवादी जकी-उर लखवीचाही या यादीत समावेश आहे. यूएपीए म्हणजेच बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा नुकताच संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. मसूद अजहर आणि हाफिज सईद या दोघांना संयुक्त राष्ट्राने ग्लोबल दहशतवादी म्हणून याआधीच घोषित केले आहे. 

 

Web Title: Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood declared terrorists under new UAPA law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.