मसालाकिंग डॉ. दातार यांचा दुबईत सन्मान; प्रतिष्ठेचा ‘रिटेल एमई आयकॉन्स अवॉर्ड’ प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 14:50 IST2021-08-12T14:48:17+5:302021-08-12T14:50:59+5:30

Dr Dhananjay Datar : डमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सरव्यवस्थापक मुहम्मद अल- तहैने यांच्या हस्ते व दुबई डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगच्या अलायन्स अँड पार्टनरशिप विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लैला मुहंमद सुहैल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Masalaking Dr. Datar honored in Dubai; Awarded the prestigious 'Retail ME Icons Award' | मसालाकिंग डॉ. दातार यांचा दुबईत सन्मान; प्रतिष्ठेचा ‘रिटेल एमई आयकॉन्स अवॉर्ड’ प्रदान

मसालाकिंग डॉ. दातार यांचा दुबईत सन्मान; प्रतिष्ठेचा ‘रिटेल एमई आयकॉन्स अवॉर्ड’ प्रदान

नवी दिल्ली : दुबईस्थित अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार (dr dhananjay datar) यांना ‘रिटेल एमई’ माध्यमगृहातर्फे नुकताच प्रतिष्ठेचा ‘रिटेल अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. डॉ. दातार यांनी मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका विभागात रिटेल उद्योगाच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 

दुबईच्या बे भागातील जेडब्ल्यू मार्क्विस येथे नुकत्याच झालेल्या शानदार समारंभात डमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सरव्यवस्थापक मुहम्मद अल- तहैने यांच्या हस्ते व दुबई डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगच्या अलायन्स अँड पार्टनरशिप विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लैला मुहंमद सुहैल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुरस्कार संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील आघाडीच्या रिटेलर्सची ओळख जगाला पटवून देणे हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. प्रवर्तक त्यालाच म्हटले जाते जो सुप्त संधी बघतो, पायाभरणीचे धैर्य दाखवितो आणि साहसी शोधक वृत्तीने सीमोल्लंघन करतो. यात अल अदील समूहाचाही गौरवपूर्ण समावेश आहे.

डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ‘अल अदील ट्रेडिंग’ने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून, स्वत:च्या ‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन अशा श्रेणीत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत. मसाले व पिठे तयार करून पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्वेस्टमेंट मार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. अल अदील समूहाचे सध्या ४९ आऊटलेट असून, लवकरच ५० वे आऊटलेटही सुरू होत आहे. ‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून, त्याने अलीकडेच दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनिया, स्वीत्झर्लंड, इटली तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करून आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे. 

हा मोठा सन्मान 
डॉ. दातार म्हणाले की, जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यमगृहांपैकी असणाऱ्या ‘रिटेल एमई’तर्फे कामाची दखल घेतली जाणे हा मोठा सन्मान आहे. संयुक्त अरब अमिरातीत भारतीय मसाल्यांबाबत आघाडीचे नाव असलेल्या आमच्या अल अदील समूहासाठी ही आणखी एक अभिमानास्पद कामगिरी आहे. आमच्यावर अधिक उत्तम कामगिरी करून दाखविण्याची जबाबदारी आली आहे. पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल ‘रिटेल एमई’ला धन्यवाद देतो. हा पुरस्कार एकप्रकारे माझी पत्नी वंदना, मुले हृषीकेश व रोहित आणि अल अदीलच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या पाठबळाचेच प्रतिबिंब आहे.

Web Title: Masalaking Dr. Datar honored in Dubai; Awarded the prestigious 'Retail ME Icons Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.