विवाहीत महिला आर्किटेक्टकडे वकिलाने केली सेक्सची मागणी! पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:41 IST2017-10-05T12:37:23+5:302017-10-05T12:41:56+5:30

सारखेज पोलीस स्टेशनमध्ये बंद असलेल्या पतीची जामिनावर सुटका करता यावी यासाठी तिने शहरातील एक वकिलाकडे आपले वकिलपत्र दिले होते.

Married woman architect, advocate sex demand! In the police station filed a complaint | विवाहीत महिला आर्किटेक्टकडे वकिलाने केली सेक्सची मागणी! पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

विवाहीत महिला आर्किटेक्टकडे वकिलाने केली सेक्सची मागणी! पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ठळक मुद्देपीडित महिला आर्किटेक्ट सारखेज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आल्यानंतर वकिलाने साणंद क्रॉसरोडवळ तिला आपल्या गाडीत बसवले.

अहमदाबाद - शरीरसुखाची मागणी करणा-या वकिलाविरोधात एका तरुण महिला आर्किटेक्टने गुजरातच्या वेजालपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास करण्यास सुरुवात केली आहे. तक्रार दाखल करणारी महिला आर्किटेक्ट विवाहीत असून तिच्या पतीवर बलात्काराचा आरोप आहे. 

सारखेज पोलीस स्टेशनमध्ये बंद असलेल्या पतीची जामिनावर सुटका करता यावी यासाठी तिने शहरातील एक वकिलाकडे आपले वकिलपत्र दिले होते. सारखेज पोलीस स्टेशनमध्ये आर्किटेक्ट महिलेच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. 

पीडित महिला आर्किटेक्ट सारखेज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आल्यानंतर वकिलाने साणंद क्रॉसरोडवळ तिला आपल्या गाडीत बसवले. तिथे त्याने अश्लील प्रस्ताव देत सेक्सची मागणी केली असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ज्यावेळी वकिलाला या आरोपांसंबंधी विचारण्यात आले तेव्हा त्याने आरोप फेटाळून लावले. हा माझ्या बदनामीचा प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले. 
 

Web Title: Married woman architect, advocate sex demand! In the police station filed a complaint