शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार; केरळ उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 7:54 AM

Marriage registration: विशेष विवाह अधिनियम नुसार एका प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. विशेष विवाह अधिनियम नुसार एका प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांची ओळख पटविणे हे एक आव्हान होते, मात्र आता पर्याय म्हणून फेसिअल रेकग्निशन आणि बायोमेट्रीक सारखे तंत्रज्ञान वापरून लग्न नोंदणी करता येणार आहे. 

जस्टिस महम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या पीठाने केंद्र सरकारच्या अधिवक्त्यांना या संबंधी पक्षकारांची ओळख पटविण्यासाठी फेसिअल रेकग्निशन व अन्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्राकडून नितीगत निर्देश देण्यात यावेत असे म्हटले आहे.खंडपीठाने एकल पीठाचे न्यायाधीश पीबी सुरेश कुमार यांच्या निर्णयावर सहमती दर्शविली. वधू-वर उपस्थित नसताना त्यांचा विवाह नोंद करता येऊ शकतो, हे सांगण्यास आता काही हरकत नाही. मात्र, नोंदणी अधिकाऱ्याला या दोघांची ओळख पटविता आली पाहिजे. ऑनलाईनद्वारे ही ओळख पटविण्याच्या प्रक्रियेवर याबाबत विचार केला जावा, असे न्यायमूर्ती म्हणाले. 

याचा फायदा कोणाला...एकल पीठाच्या सुनावणीवेळी सरकारचे म्हणणे होते की, विवाह नोंदणी करण्यासाठी वर-वधू यांची उपस्थिती विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर असणे गरजेचे आहे. तसेच कोणताही एक पक्ष विवाह नोंदणी कार्यालयातील क्षेत्रीय निवासी असायला हवा. यामुळे परदेशात राहणाऱ्या लोकांचा विवाह नोंद केला जाऊ शकत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी झाल्यास याचा फायदा दुसऱ्या शहरांमध्ये किंवा देशांमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना होणार आहे. 

टॅग्स :marriageलग्नHigh Courtउच्च न्यायालय