'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:58 IST2025-07-11T11:56:56+5:302025-07-11T11:58:00+5:30

Marathi vs Hindi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा उल्लेख करत बृहभूषण यांचा राज ठाकरेंना इतिहास वाचण्याचा सल्ला.

Marathi vs Hindi 'Raj Thackeray, you won't tolerate this...', Brijbhushan Sharan Singh's direct challenge | 'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

Marathi vs Hindi : महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरुन वादंग उठले आहे. मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त मेळ्याव्यानंतर तर हा वाद आणखीनच वाढला आहे. अनेक उत्तर भारतीय नेत्यांनी या वादावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच, आता भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. 

भाजप नेने बृजभूषण यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान देताना म्हटले की, 'भाषा तोडण्याचे नाही, तर जोडण्याचे काम करते. मी राज ठाकरेंना सांगू इच्छितो की, तुमच्या या कृतीमुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतीयांचे नाते तुटणार नाही. तुम्ही वाचले पाहिजे, तुम्ही कदाचित लिहित-वाचत नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले होते, तेव्हा आमच्या आग्रा व्यापाऱ्यांनी त्यांना तुरुंगातून मुक्त करण्याचे काम केले.'

'आज ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांनी घाम गाळला आहे. आज अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहात. जेव्हा त्यांनी अयोध्येत येण्याची योजना आखली होती, तेव्हा मी त्यांना येऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळेच आता त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. राज ठाकरे, शुद्धीवर या. उत्तर भारतातील तरुण इतके संतापले आहेत की, जर एखाद्या मोठ्या व्यक्तीने आव्हान केले, तर ते सगळे तुमच्या दिशेने येतील. ते तुम्हाला सहन होणार नाही. म्हणूनच मी म्हणतोय की, राजकारण करा, पण भाषा, पंथ, जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करू नका,' अशा शब्बात बृहभूषण यांनी सुनावले.

Web Title: Marathi vs Hindi 'Raj Thackeray, you won't tolerate this...', Brijbhushan Sharan Singh's direct challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.