मारन बंधूंची चौकशी
By Admin | Updated: December 12, 2014 01:52 IST2014-12-12T01:52:56+5:302014-12-12T01:52:56+5:30
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणाचा तपास करीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने दयानिधी व कलानिधी या मारन बंधूंची त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांबाबत चौकशी केली.

मारन बंधूंची चौकशी
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस करारात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणाचा तपास करीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने दयानिधी व कलानिधी या मारन बंधूंची त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांबाबत चौकशी केली.
या आठवडय़ात माजी दूरसंचारमंत्री दयानिधी व त्यांचे भाऊ कलानिधी यांचा जबाबही तपास यंत्रणोने नोंदविला. अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, मारन बंधूंना या जाबजबाबात व्यक्तिगत व कार्यालयीन आर्थिक व्यवहारांशी संबंधित आरोपांबाबत माहिती विचारण्यात आली. काही कागदपत्रे तपास यंत्रणोला दिली आहेत.