शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याकडून राष्ट्रपती भवनचा नकाशा जप्त

By admin | Updated: June 10, 2015 00:01 IST

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद तुरुंगात काही दिवसांपूर्वी मारण्यात आलेल्या छाप्यादरम्यान एका विचाराधीन कैद्याकडे राष्ट्रपती भवनाचा नकाशा आढळला आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद तुरुंगात काही दिवसांपूर्वी मारण्यात आलेल्या छाप्यादरम्यान एका विचाराधीन कैद्याकडे राष्ट्रपती भवन आणि राजपथावरील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांचे नकाशे तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांची रेखाटने सापडल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर राज्य पोलिसांचे एक पथक तपासासाठी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहे.गत ७ जूनला राज्यभरातील तुरुंगांची झडती घेण्यात आली. या दरम्यान मुरादाबाद तुरुंगात सद्दीक अली नामक एका विचाराधीन कैद्याकडून राष्ट्रपती भवन, राजपथासारख्या अनेक संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांचे नकाशे जप्त करण्यात आले. भारत-बांगलादेश सीमेवर बनलेल्या बीएसएफच्या चौक्यांची रेखाटनेही त्याच्याकडे सापडली. एका हत्येच्या प्रकरणात सद्दीक अलीला अटक झाली होती. गत चार वर्षांपासून तो मुरादाबादच्या तुरुंगात बंद असून तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. २०११ मध्ये संभल जिल्ह्यात किरकोळ वादातून आपल्या एका सहकाऱ्याच्या कथित हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अलीच्या पिशवीतून हिंदी, मंदारिन आणि बंगाली भाषेतील काही कागदपत्रे, दोन मेमरी कार्डही जप्त करण्यात आले.मुरादाबादचे पोलीस महानिरीक्षक ओंकार सिंह यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. आम्ही सद्दीक अलीची पार्श्वभूमी तपासण्यासाठी एक पोलीस पथक प. बंगालला पाठवले आहे. याशिवाय दहशतवादविरोधी दलासही सतर्क केले आहे. अलीकडे आढळलेल्या नकाशात नवी दिल्लीच्या मार्गांचे नकाशे आहेत, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पोलीस म्हणतात, गुगलवरून डाऊनलोड केले नकाशे> अली एका चिनी नागरिकास ओळखतो. त्याच्याकडून त्याने मंदारिन भाषा शिकली. अलीकडे सापडलेले अनेक नकाशे त्याने गुगलवरून डाऊनलोड केलेले आहेत, असे पोलीस महानिरीक्षक ओंकार सिंह यांनी सांगितले. > काही वर्षांपूर्वी तो आणि त्याचे वडील उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात आले होते आणि एका मांस निर्यात कंपनीत मजुरी करायचे, अशी माहिती खुद्द अलीनेच चौकशीदरम्यान पोलिसांना दिली होती.