अनेक महिलांवर बलात्कार केला; संतप्त महिलांनी हत्येनंतर जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:51 IST2025-06-11T06:51:34+5:302025-06-11T06:51:52+5:30

Crime News: ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातून बलात्कारात आरोपी असलेल्या ६० वर्षीय आरोपीची संतप्त महिलांनी हत्या करून मृतदेह जाळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Many women were raped; angry women burned them after killing them | अनेक महिलांवर बलात्कार केला; संतप्त महिलांनी हत्येनंतर जाळले

अनेक महिलांवर बलात्कार केला; संतप्त महिलांनी हत्येनंतर जाळले

भुवनेश्वर -  ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातून बलात्कारात आरोपी असलेल्या ६० वर्षीय आरोपीची संतप्त महिलांनी हत्या करून मृतदेह जाळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी १० जणांना गजाआड केले असून, त्यात ८ महिलांचा समावेश आहे.

गावापासून २ किमी टेकडीवरून मृताची हाडे व राख ताब्यात घेतली गेली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात ज्या महिलांना पकडण्यात आले आहे, त्या सर्वांवर लैंगिक अत्याचार झाला होता. चार वर्षांपूर्वी आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर तो महिलांचे शोषण करू लागला. अटकेतील महिलांचे त्याने शोषण केलेले आहे. परंतु, महिलांनी त्याच्याविरोधात कधीही तक्रार दाखल केली नाही. गजपतीचे पोलिस अधीक्षक जतिंद्र कुमार पांडा यांनी सांगितले की, महिलांनी कधीही पोलिसांकडून मदत मागितली नाही किंवा तक्रारही दाखल केलेली नाही. मात्र, संताप अनावर झाल्यानंतर आरोपीवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला संपवले.

विधवेवर बलात्कार केल्यानंतर असंतोष वाढला
आरोपी अनेक वर्षांपासून महिलांवर अत्याचार करत होता. ३ जून रोजी त्याने विधवेवर बलात्कार केला. यानंतर संतप्त महिलांनी बैठक घेऊन आरोपीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. 
सर्व महिला त्याच्या घरी गेल्या. त्या वेळी तो झोपलेला होता. त्याचवेळी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले गेले. हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला. या घटनेत दोन पुरुषांनीही महिलांना मदत केली.

Web Title: Many women were raped; angry women burned them after killing them