शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'कमल का फूल, बडी भूल' म्हणणारे मानवेंद्र सिंह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 09:01 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवेंद्र सिंह आज नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

जयपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवेंद्र सिंह आज नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मानवेंद्र सिंह यांच्या समवेत त्यांच्या पत्नी चित्रा सिंह आणि भाऊ भुपेंद्र सिंह हे देखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  गेल्या महिन्यात भाजपाचे आमदार असलेल्या मानवेंद्र सिंह यांनी बारमेरमध्ये झालेल्या 'स्वाभीमान रॅली'दरम्यान आपण भाजपा सोडणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना 'कमल का फूल, बडी भूल' असे त्यांनी म्हटले होते.मानवेंद्र सिंह हे 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर बारमेर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जसवंत सिंह यांचा पत्ता कट केल्याची चर्चा त्यावेळी राजस्थानच्या राजकारणात होती. तसेच, यामुळे जसवंत सिंह कुटुंबीय व वसुंधरा यांच्यात कटुता निर्माण झाली होती.दरम्यान, मानवेंद्र सिंह यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पश्‍चिम राजस्थानमध्ये पार्टीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे भाजपाने म्हटले आहे. मानवेंद्र सिंह यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या चुकीचा आहे. यामुळे भाजपाला मिळणारा राजपूतांच्या मतांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे भाजपा नेते राजेंद्र राठोड यांनी सांगितले.

('कमल का फूल हमारी भूल थी'; मानवेंद्र सिंह यांचा भाजपाला रामराम)

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानBJPभाजपा