शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Pal : जिद्द, चिकाटी, यश! ४० परीक्षांमध्ये नापास; १२ वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांचा लेक झाला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:16 IST

Manoj Pal : प्रत्येक अपयशाने एक नवा धडा शिकवला आणि अखेर १२ वर्षांनंतर स्वप्न साकार झालं.

काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि अपार मेहनत असेल तर स्वप्नं नक्कीच पूर्ण होतात. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने हेच सिद्ध करून दाखवलं आहे. तब्बल ४० परीक्षांमध्ये अपयशाचा सामना करूनही जिद्द कायम ठेवली. मनोज पाल यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. सरकारी शाळेतील शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी हा संघर्ष सुरू ठेवला. प्रत्येक अपयशाने त्यांना एक नवा धडा शिकवला आणि अखेर १२ वर्षांनंतर त्यांचं स्वप्न साकार झालं.

एका मुलाखतीत मनोज पाल सांगतात की, त्यांचा प्रवास एका छोट्याशा गावातून सुरू झाला. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण सरकारी शाळेत झालं, जिथे सोयी-सुविधा नव्हत्या. बारावीच्या परीक्षेत त्यांना केवळ ५० टक्के गुण मिळाले होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरकारी नोकरी मिळवून कुटुंबाला हातभार लावण्याचा त्यांनी निर्धार केला.

४० वेळा अपयश, पण जिद्द कायम

MPPSC (मध्य प्रदेश लोकसेवा आयोग) च्या तयारीसोबतच त्यांनी इतर स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरू केली होती. सर्वप्रथम त्यांनी फॉरेस्ट गार्डसाठी अर्ज भरला, परीक्षा उत्तीर्ण केली, पण ते अपयशी ठरले. यानंतर त्यांनी MPPSC चे ६ प्रयत्न आणि इतर मिळून ४० परीक्षांमध्ये अपयश पाहिलं. अनेकदा पदरी निराशा आली, सोबतचे मित्र पुढे जात असल्याचं पाहून मन विचलित झालं, पण मनोज यांनी आपलं ध्येय सोडायचं नाही असा ठाम निश्चय केला होता.

आर्थिक चणचण आणि अभ्यासाची सांगड

आर्थिक आव्हानांशी लढताना मनोज यांनी आपली जिद्द नाही. इंदूरमध्ये राहून त्यांनी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि कंटेंट रायटिंगचं कामही केलं. या कठीण काळामुळे ते मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर झाले. "दुसऱ्यांना मदत करणं आणि सतत शिकत राहणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे" असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. 

१२ वर्षांची प्रतीक्षा संपली; मिळवला १५ वा रँक

परीक्षांची तयारी करता करता १२ वर्षे उलटली होती आणि अखेर तो दिवस उजाडला ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. MPPSC च्या ७ व्या प्रयत्नात त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. २०२४ च्या MPPSC परीक्षेत मनोज यांनी राज्यात १५ वा रँक पटकावला आणि मुलाखतही यशस्वीपणे पूर्ण केली. सध्या ते 'असिस्टंट डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Perseverance pays off: Farmer's son clears exam after 40 failures.

Web Summary : After 40 failed attempts and 12 years of struggle, a farmer's son achieved his dream. Overcoming financial hardships and academic challenges, Manoj Pal secured the 15th rank in the MPPSC exam, becoming an Assistant Director. His relentless dedication inspires.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी