शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

मन की बात : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट अधिक हमीभाव देण्याचा प्रयत्न - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 12:03 IST

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या आजच्या संबोधनामध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवर्जुन उल्लेख केला.

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या आजच्या संबोधनामध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवर्जुन उल्लेख केला. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी देशातील कृषिबाजारांमध्ये सुधारणा घडवण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतमालाला योग्य बाव देण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून, शेतमालाला उप्तादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मोदींनी सांगितले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातच्या 42 व्या भागामध्ये देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी शिक्षण आरोग्य, जलसंवर्धन, कृषी,  स्वच्छता, औद्योगिक विकास अशा विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी आपल्याला शेतकऱ्यांनी पत्रांच्या माध्यमातून हमीभावाबाबत केलेल्या विचारणेचा उल्लेख करत सरकार शेतमालाला उप्तादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. "  महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, लोहिया, चौधरी चरण सिंह, चौधरी देवीलाल यांनी शेती आणि शेतकरी हे देशाची अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी देशातील कृषिबाजारांमध्ये सुधारणा घडवण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतमालाला योग्य बाव देण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून, शेतमालाला उत्पादनापेक्षा दीडपट अधिक हमीभाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मोदी म्हणाले. 

 

आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात ग्रामस्वराज अभियान मन की बातमध्ये मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा आवर्जुन उल्लेख केला. "आंबेडकरांनी भारताच्या औद्योगिकरणाचे मत मांडून औद्योगिक शक्ती म्हणून भारताचे स्वप्न पाहिले होते. डॉ. आंबेडकरांचे व्हिजन प्रेरणादायी आहे. तसेच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या मागास आणि गरीबांची प्रेरणा आहेत, असे मोदी म्हणाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान संपूर्ण देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.मोदींच्या मन की बातमधील महत्त्वाचे मुद्दे -  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमिती 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान संपूर्ण देशभरात ग्रामस्वराज अभियान राबवणार -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या मागास आणि गरीबांसाठी प्रेरणा- आंबेडकरांनी भारताच्या औद्योगिकरणाचे मत मांडले होते- आयुष्मान भारत कार्यक्रमांतर्गत 10 कोटी कुटुंबे आणि 50 लाख नागरिकांनासरकार आणि विमा कंपन्या 5 लाखांपर्यंत मदत देतील- आरोग्यसेवा स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी प्रयत्न- देशात हेल्थ वेलनेस सेंटर उभारण्याची योजना- योग आता एक चळवळ बनली आहे - स्वच्छ आणि स्वस्थ भारत एकमेकांसाठी पुरक - देशातील आरोग्य व्यवस्थेवर विशेष लक्ष, संबंधित मंत्रालये एकत्र येऊन काम करत आहेत-  शेतकऱ्यांच्या मेहनतीला तंत्रज्ञानाची साथ मिळाली- सरकराने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना उत्पादनाच्या किमतीपेक्षा दीडपट अधिक भाव देण्यासाठी तरतूद केली आहे-  शेतकऱ्यांनी पत्र पाठवून हमीभावाबाबत विचारणा केली-  मेघालयमधील शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक उत्पन घेऊन दाखवले- पुढचे काही महिने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण, शेतीसंबंधी माहितीसाठी शेतकऱ्यांनी डीडी किसान ही वाहिनी पाहावी - कोलकाता येथील सैदुल लस्कर या कॅबचालकांनी प्रयत्नपूर्वक रुग्णालये बांधली - रामनामाची शक्ती महात्मा गांधींच्या जीवनात महत्त्वाची   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारतFarmerशेतकरी