शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

Mann ki Baat : तिहेरी तलाकच्या मुद्यावर मुस्लिम महिलांना मिळणार न्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 14:47 IST

Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या रक्षबंधनाच्या शुभेच्छा...

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'रक्षाबंधन सण हा भाऊ-बहिणीतील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. शिवाय, फार पूर्वीपासून सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण देखील राहिले आहे'. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. 16 ऑगस्टला संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. सर्व देशवासीयांच्या आठवणीत अटलजी कायम असतील, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे :

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जन्माष्टमीच्याही शुभेच्छा दिल्या. 2 सप्टेंबरला संपूर्ण वातावरण 'हाथी, घोड़ा, पालकी–जय कन्हैयालाल की, गोविंदा-गोविंदा' या जयघोषानं दणाणून निघेल, असं ते म्हणालेत.

2. बंगळुरू येथील इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी चिन्मयीनं आज संस्कृत दिवस असल्याची माहिती दिल्यााबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचे आभार मानले.

3. केरळमध्ये आलेल्या जलप्रलयाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, या कठिण प्रसंगी संपूर्ण देश केरळसोबत उभा आहे.

4. काल ओणम सणाचे पर्व सुरू झाले. आपण अशी प्रार्थना करुया की, हे ओणम पर्व देशाला विशेषतः केरळला शक्ती देवो. जलप्रलयाच्या संकटातून केरळ लवकर बाहेर येवो आणि केरळच्या विकासाच्या यात्रेला अधिक गती मिळो. 

5. केरळमध्ये आलेल्या जलप्रयलामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कठिण परिस्थितीत संपूर्ण देश केरळच्या बाजूनं उभा आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोकदेखील व्यक्त करण्यात आला.  

6. शिक्षक दिनानिमित्त देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. त्यांचा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनाच्याही देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. 

7. तिहेरी तलाक मुद्याबाबत मुस्लिम महिलांना न्याय मिळणार, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

8. 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणार आहोत, असं म्हणत पंतप्रधानांनी आशियाई स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.   

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRaksha Bandhanरक्षाबंधन