‘मन की बात’मधून आतापर्यंत ३४.१३ कोटी रुपये कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:22 IST2025-08-09T08:21:03+5:302025-08-09T08:22:35+5:30

मुरुगन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्यसभेत सांगितले.

Mann Ki Baat has earned Rs 34 crore 13 lakh so far | ‘मन की बात’मधून आतापर्यंत ३४.१३ कोटी रुपये कमाई

‘मन की बात’मधून आतापर्यंत ३४.१३ कोटी रुपये कमाई

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ३४.१३ कोटी रुपये कमाई झाली असल्याचे माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्यसभेत सांगितले.

हा कार्यक्रम आकाशवाणीवर उपलब्ध असलेल्या साधनांच्या आधारे कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना तयार केला जात असल्याचे मुरुगन म्हणाले. हा कार्यक्रम पारंपरिक व डिजिटल अशा दोन्ही माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहचवला जातो. राष्ट्रीय व प्रादेशिक अशा माध्यमातून याचे प्रसारण केले जाते.  जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहचत असून, यातून उत्पन्न मिळाले असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Mann Ki Baat has earned Rs 34 crore 13 lakh so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.