2G स्पेक्ट्रम निकाल; युपीए सरकारविरोधातील दुष्प्रचाराला उत्तर मिळालं - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 01:30 PM2017-12-21T13:30:04+5:302017-12-21T13:34:07+5:30

Manmohan singhs reaction on 2G Spectrum Scam Result | 2G स्पेक्ट्रम निकाल; युपीए सरकारविरोधातील दुष्प्रचाराला उत्तर मिळालं - मनमोहन सिंग

2G स्पेक्ट्रम निकाल; युपीए सरकारविरोधातील दुष्प्रचाराला उत्तर मिळालं - मनमोहन सिंग

Next

नवी दिल्ली- 'युपीए सरकारविरोधात दुष्प्रचार करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व आरोप निराधार असल्याचं सिद्द झालं. चुकीच्या पद्धतीने सर्व आरोप लावण्यात आले होते', अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2G स्पेक्ट्रम निकालानंतर दिली आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो असंही मनमोहन सिंग यांनी म्हंटलं आहे. माजी कॅग प्रमुख विनोद राय यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस करत आहे. सध्या विनोद राय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आहेत. 



 

युपीए-2 कार्यकाळात झालेल्या सर्वात मोठ्या 2जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय भूकंप आला असून, काँग्रेस नेत्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे, रस्त्यापासून ते थेट सभागृहापर्यंत सरकारला धारेवर धरत आहेत. ज्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे आम्ही विरोधी पक्षात आलो, तो घोटाळा झाला नाही असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद बोलले आहेत. राज्यसभेत याप्रकरणी गदारोळ करण्यात आला. 

'विरोधकांच्या खोट्या आरोपांचा घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय युपीए सरकारवर निराधार आरोप करण्यात आले होते. तत्कालीन कॅग प्रमुख विनोद राय यांनी काँग्रेस सरकारविरोधात षडयंत्र रचलं होतं. या निर्णयामुळे विनोद राय नेमकं कुणासाठी काम करत होते हे सिद्ध झालं आहे', असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी म्हंटलं.



 

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी.चिंदबरम यांनीही निर्णयाचे स्वागत केलं आहे. या प्रकरणात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे होते, अशी प्रतिक्रिया चिंदबरम यांनी निकालानंतर व्यक्त केली. सरकारमध्ये सर्वोच्च पातळीवर भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपामध्ये अजिबात तथ्य नव्हते. हे आजच्या निकालाने सिद्ध झाले असं चिंदबरम म्हणाले. 



 

Web Title: Manmohan singhs reaction on 2G Spectrum Scam Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.