शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग अ‍ॅक्सिडेंटल नव्हे, तर यशस्वी प्राइम मिनिस्टर- शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 16:32 IST

नरसिंह राव यांच्यानंतरचे सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणजे मनमोहन सिंग

नवी दिल्ली: द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटावरून वाद सुरू असताना आता यात शिवसेनेनं उडी घेतली आहे. मनमोहन सिंग हे अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर नव्हते, ते यशस्वी पंतप्रधान होते, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नरसिन्हा राव यांच्यानंतर देशाला मिळालेले सर्वात्तम पंतप्रधान अशा शब्दांमध्ये राऊत यांनी मनमोहन सिंग यांचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.जर एखादे पंतप्रधान 10 वर्षे देशाचा गाडा हाकत असतील आणि त्यानंतरही लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना असेल, तर ते अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहेत असं मला वाट नाही, असं संजय राऊत म्हणाले. राऊत यांच्या या अप्रत्यक्ष टीकेला भाजपाकडून नेमकं काय उत्तर मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्यावर काँग्रेस पक्षानं जोरदार टीका केली. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप काँग्रेसनं नोंदवला. द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर प्रदर्शित करण्याआधी काँग्रेससाठी त्याचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्र युथ काँग्रेसनं केली. या चित्रपटातून कोणत्याही चुकीच्या आणि तथ्यहीन गोष्टी लोकांसमोर येऊ नयेत. त्यामुळे काँग्रेससाठी चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग करण्यात यावं, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. या चित्रपटातून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे. द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :The Accidental Prime Minister Movieद एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरManmohan Singhमनमोहन सिंगShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी