शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा, मनमोहन सिंग यांचा नरेंद्र मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 09:41 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमीत-कमी शब्दांत जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

ठळक मुद्देमोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला अनुरुप असायला हवी - सिंगयूपीए सरकारच्या काळात भाजपाशासित राज्यांसोबत भेदभाव केला नाही - सिंगसंयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी, मनमोहन सिंग यांचा सल्ला

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमीत-कमी शब्दांत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आचरणातून सर्वांसमोर चांगले उदाहरण प्रस्थापित केले पाहिजे. त्यांची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला अनुरुप असायला हवी', असा सल्ला मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.

 

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या वेळी ते बोलत होते. मनमोहन सिंग असंही म्हणाले की, पंतप्रधानांना माझा सल्ला आहे की, त्यांनी संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी. सध्या सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना प्रचाराची पातळी घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना हा सल्ला देऊ केला आहे. 

''पंतप्रधान म्हणून जेव्हा मी भाजपाशासित राज्यांचा दौरा करत होतो. त्यावेळेस भाजपाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर माझे चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यास दुजोरा देतील. यूपीए सरकारच्या काळात भाजपाशासित राज्याबरोबर मी कधीच भेदभाव केला नाही'', असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपा