शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 16:11 IST

राफेल डीलवरुन मनमोहन सिंग यांची मोदींवर टीका

इंदूर: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राफेल डीलवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. राफेल खरेदीचा व्यवहार संशयास्पद असल्यानं संयुक्त संसदीय समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. मात्र यासाठी सरकार तयार नाही. यावरुनच या संपूर्ण व्यवहारात काहीतरी काळंबेरं असल्याचं दिसून येतं, अशा शब्दांमध्ये माजी पंतप्रधानांनी मोदींवर जोरदार टीका केली. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनमोहन सिंग इंदूरला आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'देशवासीयांच्या मनात राफेल कराराबद्दल शंका आहेत. या कराराच्या चौकशीसाठी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केलेली आहे. मात्र मोदी सरकार यासाठी तयारी नाही. यावरुनच या व्यवहारात काहीतरी काळंबेरं असल्याचं समजून येतं,' असं मनमोहन सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी रोजगाराच्या मुद्यावरुनही सरकारवर टीका केली. मोदी सरकार दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार होतं. या आश्वासनाचं काय झालं?, असा प्रश्न मनमोहन सिंग यांनी उपस्थित केला. मनमोहन सिंग यांच्या पत्रकार परिषदेआधी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मनमोहन सिंग हे रिमोट कंट्रोलनं चालणारे पंतप्रधान होते, अशा शब्दांमध्ये विजयवर्गीय यांनी सिंग यांच्यावर तोंडसुख घेतलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या रिमोटनं मनमोहन सिंग यांचं सरकार चालायचं, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी कोळसा, 2जी सह विविध घोटाळ्यांचा दाखला देत मनमोहन सिंग केवळ मूठभर लोकांना फायदेशीर ठरणारे निर्णय घ्यायचे, असा आरोपदेखील विजयवर्गीय यांनी केला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशात एकूण 11 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा