मणिपूर हिंसाचार: अत्याचारात सामील आणखी दोघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 05:30 IST2023-07-23T05:29:17+5:302023-07-23T05:30:31+5:30
मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींनी अटक केली आहे.

मणिपूर हिंसाचार: अत्याचारात सामील आणखी दोघे जेरबंद
इम्फाळ : मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींनी अटक केली आहे. त्यालील एक १९ वर्षांचा आहे. महिलांवर केलेल्या भयंकर अत्याचारांची २६ सेकंदांची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाली होती.
या अत्याचारांविरोधात देशभरात उसळलेली संतापाची लाट शनिवारी आणखी तीव्र झाली. दरम्यान, विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पहिल्या आरोपीला अटक केली.