मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार! घरांची तोडफोड, जाळपोळ; संचारबंदी लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:01 IST2023-05-22T17:01:12+5:302023-05-22T17:01:32+5:30
Manipur Violence: निमलष्करी दल आणि लष्कर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नात

मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार! घरांची तोडफोड, जाळपोळ; संचारबंदी लागू
Manipur Violence: मणिपूरमध्ये सोमवारी दुपारी पुन्हा आग लागली. इम्फाळ पूर्वमध्ये दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर हिंसाचार उसळला. हल्लेखोरांनी रिकाम्या घरांची तोडफोड करून आग लावली. तसेच छावणीत झोपलेल्या लोकांवर हल्ला केला. परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, राज्याची राजधानी इम्फाळमधील न्यू चेकोन भागात मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये भांडण झाले. स्थानिक बाजारपेठेत जागेवरून हाणामारी सुरू झाली. परिसरात जाळपोळ झाल्याच्या वृत्तानंतर पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये एका महिन्याहून अधिक काळ विविध मुद्द्यांवरून समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे.
#WATCH | Abandoned houses set ablaze by miscreants in New Lambulane area in Imphal in Manipur. Security personnel on the spot. pic.twitter.com/zENI5nuMyM
— ANI (@ANI) May 22, 2023
या महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये आदिवासींनी 3 मे रोजी एकता मोर्चा काढल्यानंतर माईतींना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी संघर्ष सुरू झाला. आठवडाभराहून अधिक काळ चाललेल्या या हिंसाचारात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेला आग लागली आणि हजारो लोकांना सरकारी मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला.
कुकी ग्रामस्थांना राखीव वनजमिनीतून बेदखल करण्यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे याआधीही अनेक चकमकी झाल्या होत्या, ज्यामुळे अनेक छोटी आंदोलने झाली होती. याप्रमाणे, राज्यातील 64 टक्के लोकसंख्या मेईतेई समुदायाची आहे. राज्याच्या 10 टक्के क्षेत्रावर त्यांचा कब्जा आहे कारण अधिसूचित डोंगराळ भागात बिगर आदिवासींना जमीन खरेदी करण्याची परवानगी नाही. त्यांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश केल्यास ते डोंगराळ भागात जमीन खरेदी करू शकतील. त्यामुळे आदिवासींमध्ये नाराजी आहे.
निमलष्करी दल आणि लष्करही राज्यात सतत गस्त घालून नागरिकांना मदत करण्यात गुंतलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले असून त्यांनी दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींची भेट घेतली आहे.