Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:57 IST2024-11-21T10:55:41+5:302024-11-21T10:57:15+5:30

Coordinating Committee on Manipur Integrity: कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा.

manipur violence Coordinating Committee on Manipur Integrity modi government | Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

इम्फाळ : तीन महिला, तीन मुले अशा सहाजणांची हत्या करणाऱ्या कुकी दहशतवाद्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी एनडीएच्या आमदारांनी केल्यानंतर व  तसा ठराव संमत केल्यामुळे को-ऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटेग्रिटी (कोकोमी) या संस्थेने आपले आंदोलन आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
 
कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. 

एनडीए आमदारांच्या बैठकीत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावावर नेमकी काय कार्यवाही होते याकडे आमचे बारीक लक्ष आहे. त्या घडामोडींनुसार पुढचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: manipur violence Coordinating Committee on Manipur Integrity modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.