शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
2
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
3
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
4
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
5
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
6
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
7
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
8
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
9
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
10
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
11
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
12
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
14
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
15
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
16
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
17
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
18
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
19
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
20
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

Manipur: मणिपूरमध्ये पुन्हा भाजप; बीरेन सिंह यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:31 IST

Manipur: एन बिरेन सिंग यांच्यासह इतर पाच आमदारांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत इतर पक्षांच्या पाठिंब्यानंतर भाजप सरकारचे संख्याबळ 41 झाले आहे.

इंफाळ: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग सोमवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. इंफाळमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एन बिरेन सिंह यांची एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. सिंह यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर केंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा एक अतिशय चांगला निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, यामुळे मणिपूरमध्ये एक स्थिर आणि जबाबदार सरकार आले आहे, असा विश्वासही व्यक्त केला. 

5 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलीएन बिरेन सिंग यांच्याशिवाय नेमचा किपगेन, वाय. खेमचंद सिंग, ठाकूर. बिस्वजित सिंह, अवांगबू न्यूमाई आणि गोविंददास कोन्थौजम या पाच आमदारांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बिरेन सिंग यांची 32 आमदारांसह भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांनी बीरेन सिंग यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते.

भाजपकडे 41 जणांचे संख्याबळराजभवनच्या निवेदनात म्हटले आहे की, जनता दल, दोन राजकीय पक्षांच्या सहा सदस्यांनी, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन सदस्य आणि एक अपक्ष यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्यांची पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सादर करण्यात आली आहेत. यासह, 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे संख्याबळ 41 झाले आहे. कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, एन बिरेन सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

भाजप दुसऱ्यांदा सत्तेत 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपने 32 जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केले. काँग्रेसच्या वाट्याला फक्त पाच जागा आल्या. याशिवाय 7 जागा NPP, 7 NPF आणि 11 जागा इतरांना गेल्या आहेत. 2017 च्या निवडणुकीत, भाजप हा काँग्रेसनंतरचा दुसरा पक्ष होता, तरीही त्यांनी काँग्रेसच्या निवडून आलेल्या सदस्यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले आणि एन बीरेन सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसच्या 28 च्या तुलनेत केवळ 21 जागा असूनही 2017 मध्ये भाजपला दोन स्थानिक पक्ष, NPP आणि NPF- सोबत सरकार स्थापन करण्यात यश आले.

टॅग्स :Manipur Assembly Election 2022मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा