शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

माणिक साहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:00 IST

Manik Saha : माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभा खासदार देखील आहेत. 

नवी दिल्ली : त्रिपुरात बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपने माणिक साहा (Manik Saha) यांना नवे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर माणिक साहाच्या नावासह इतरही नावांची चर्चा होती. अखेर सर्व नेत्यांनी माणिक साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे माणिक साहा आता लवकरच शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारू शकतात. दरम्यान, माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभा खासदार देखील आहेत. 

शनिवारी बिप्लब देब यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर बिप्लब देब यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी 2023 नंतरही आम्हाला त्रिपुरामध्ये दीर्घकाळ सरकार हवे आहे. त्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू आहे. संघटनेसाठी हे काम मी स्वतः केले आहे. पक्षाने आम्हाला जे काही काम दिले आहे, ते जिथे फिट केले जाईल, ते काम करू, असे बिप्लब देब म्हणाले. यादरम्यान बिप्लब देब यांना नवीन मुख्यमंत्र्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र त्यांनी हे अद्याप माहित नसल्याचे सांगितले. तसेच, हायकमांडच्या सांगण्यावरूनच राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या मुख्यमंत्रीपदासाठी तीन नावे होती चर्चेतबिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा जोर धरू लागली. यासाठी भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये दिल्लीहून त्रिपुराला गेलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांचा सहभाग होता. यावेळी, त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत तीन नावे समोर आली होती. यामध्ये माणिक साहा यांच्यासह जिष्णू देब वर्मा आणि प्रतिमा भौमिक यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, अखेर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माणिक साहा यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तंब केले.  

टॅग्स :Tripuraत्रिपुराBJPभाजपा