शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

Manik Saha : डेंटिस्ट ते सर्वात श्रीमंत आमदार... नंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री, जाणून घ्या माणिक साहा यांचा प्रवास... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:54 IST

Manik Saha : माणिक साहा यांनी आज सलग दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयानंतर माणिक साहा यांनी आज सलग दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. साहा यांच्या नवीन मंत्रिमंडळात भाजप आणि आयपीएफटीच्या आठ आमदारांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. दरम्यान, माणिक साहाची कारकीर्द खूपच रंजक राहिली आहे. ते व्यवसायाने डेंटिस्ट होते. यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि सर्वात श्रीमंत आमदार ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. चला जाणून घेऊया माणिक साहा यांच्याबद्दल...

डेंटिस्ट ते राजकारणी70 वर्षीय माणिक साहा हे डेंटिस्ट ते राजकारणी बनले आहेत. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून बीडीएसचे शिक्षण घेतलेल्या माणिक साहा यांना भाजपने गेल्या वर्षीच त्रिपुराचे मुख्यमंत्री बनवले होते. माणिक साहा हे एक खेळाडू होते. तसेच, ते त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख होते. याशिवाय, माणिक साहा हे 2020 ते 2022 दरम्यान त्रिपुरामध्ये भाजपचे प्रमुखही राहिले आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते राज्यसभेवर निवडून गेले होते. 

भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेसमध्ये होते माणिक साहा भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माणिक साहा काँग्रेसमध्ये होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बूथ व्यवस्थापन समिती आणि राज्यस्तरीय सदस्यत्व मोहिमेच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. माणिक साहा हे मुख्यमंत्री होण्याच्या एक महिना आधी राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व सोडले. 

त्रिपुराचे सर्वात श्रीमंत आमदारत्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम त्रिपुराच्या टाउन बारदोवली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. माणिक साहा यांनी यावेळी 1257 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 19586 मते मिळाली तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आशिष कुमार साहा यांना 18329 मते मिळाली. तसेच, माणिक साहा यांच्याकडे एकूण 13.90 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 1.10 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्ता आणि 12.80 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराPoliticsराजकारणBJPभाजपा