शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मेंगलोर : बंदरावरील मजुरांची कमाई किती? काही लाखांत... तेही काम न करता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 12:46 IST

मेंगलोर : मेंगलोरच्या बंदरावर दररोज लाखो टनांच्या मालाचा चढ-उतार होतो. मात्र, एकही किलोचाही माल न उचलता तेथील कामगार महिन्याला लाख रुपयांची कमाई करत आहेत. अशा प्रकारचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने देशभरातील इतर पोर्ट ट्रस्टनाही चौकशीचे आदेश दिले आहेत.  कर्नाटकमधील मेंगलोर बंदरावर हा प्रकार काही वर्षांपासून होत होता. पोर्ट ट्रस्टचे नवे अध्यक्ष ...

मेंगलोर : मेंगलोरच्या बंदरावर दररोज लाखो टनांच्या मालाचा चढ-उतार होतो. मात्र, एकही किलोचाही माल न उचलता तेथील कामगार महिन्याला लाख रुपयांची कमाई करत आहेत. अशा प्रकारचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने देशभरातील इतर पोर्ट ट्रस्टनाही चौकशीचे आदेश दिले आहेत. 

 कर्नाटकमधील मेंगलोर बंदरावर हा प्रकार काही वर्षांपासून होत होता. पोर्ट ट्रस्टचे नवे अध्यक्ष एम.टी. कृष्णा यांनी रुजू होताच सर्व भागधारकांची बैठक घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की बंदरावरील चार ठिकाणच्या क्रेनसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे आकारले जातात. यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी माल उतरवर आहोत.  या तक्रारीनंतर कृष्णा यांनी केलेल्या चौकशीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आले. 

प्रत्येक शिफ्टमध्ये 10 मजूर तैनातया ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये 10 मजूर तैनात असतात. याला राष्ट्रीय आरक्षण म्हणतात. यानुसार या मजुरांना कोणतेही काम नसताना आरक्षित केले गेले. आणि त्यांना कोणतेही काम न देता प्रत्येक महिन्याला 60 ते 80 हजार रुपयांचे वेतन दिले गेले. 

 अशाच प्रकारे मागील महिन्यापर्यंत जहाजांमध्ये सामान चढविणारे- उतरविणाऱ्या मजुरांना एका टनाला 3 रुपये मजुरी देण्यात आली . महत्वाचे म्हणजे त्यांना केवळ 1.30 रुपये चेकद्वारे तर उर्वरित रक्कम रोख स्वरुपात देण्यात आली. अशाप्रकारे एक मजुर महिन्याला 2.5 लाखांपर्यंत कमाई करत आहे. या प्रकरणात कृष्णा यांनी मजुरांची संघटना आणि इतर संघटनांसोबत बैठका घेतल्या आणि त्यांना बंदरांच्या भल्यासाठी असे प्रकार न करण्यास बजावले आहे. तसेच त्यांना सुधारण्यासाठी 15 दिवसांची वेळ दिल्याचे कृष्णा यांनी सांगितले. 

देशातील अन्य 11 पोर्ट ट्रस्टनाही अलर्टया मजुरांच्या कामाईतून क्रेन ऑपरेटरांनाही पैसा मिळत होता. यामुळे ते जादा मालाची चढ-उतार करायचे. हा प्रकार समोर आल्याने कदाचित कारवाई रोखण्यासाठी पोर्ट ट्रस्ट आणि श्रमिक संघाकडून बंदरावरील यांत्रिकीकरणाविरोधात संप पुकारण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरातील अन्य 11 मोठ्या बंदरांच्या प्रशासनाला त्यांच्याकडे असे प्रकार होत असतील, याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Mangaluruमंगळुरू