मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून पंतप्रधान मोदी यांना आंबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 09:32 IST2021-07-02T09:31:42+5:302021-07-02T09:32:07+5:30

निवडणुकीनंतर राज्याचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात गंभीर संघर्षही बघायला मिळाला.

Mango from Chief Minister Mamata Banerjee to Prime Minister Modi | मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून पंतप्रधान मोदी यांना आंबे

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून पंतप्रधान मोदी यांना आंबे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी बदलताना दिसत आहेत. बनर्जी यांनी मोदी यांच्यासाठी बंगालचे स्वादिष्ट आंबे पाठवले आहेत. राजकीय कटुता दूर करण्यासाठी नेत्यांकडून आंबे पाठवण्याची एक परंपरा आहे. निवडणुकीनंतर राज्याचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात गंभीर संघर्षही बघायला मिळाला.

बनर्जी यांच्याकडून मोदी यांना हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग आंबे पाठवण्यात आले आहेत. असेच आंबे बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पाठवले गेले आहेत. 

Web Title: Mango from Chief Minister Mamata Banerjee to Prime Minister Modi