मनेष शेळके यांची बातमी-२
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:12+5:302015-02-14T23:52:12+5:30
भ्रष्टाचार करणार नाही, करू दिला जाणार नाही

मनेष शेळके यांची बातमी-२
भ रष्टाचार करणार नाही, करू दिला जाणार नाहीआप कार्यकर्त्यांनी घेतली शपथ (फोटो आहे)औरंगाबाद : मी भ्रष्टाचार करणार नाही, तसेच करूही देणार नाही. शहर भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणाचे काटेकोरपणे पालन करीन, अशी शपथ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने आप कार्यकर्त्यांत उत्साह संचारलेला आहे. शहरातील कलश मंगल कार्यालयात जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शपथ घेतली. तसेच नागरिकांत जाऊन प्रत्यक्ष काम करा, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. आम आदमी पार्टी देशातील राजकारण बदलू इच्छित आहे. दिल्लीसारखा बदल होण्यासाठी कामाला सुरुवात करा. आपली नोकरी, व्यवसाय करून पक्षाला वेळ द्या, अशा प्रकारे सर्वांनीच काम केले तर महाराष्ट्रातही आपचा झंझावात निर्माण होण्यास वेळ लागणार नसल्याचे सुभाष लोमटे यांनी सांगितले. तर जिल्हा संयोजिका मनीषा चौधरी यांनी शहरात रस्त्यांची झालेली दुरवस्था, समांतर खाजगीकरणामागे काय हेतू आहे, यासह अन्य समस्यांचा पाढाच यावेळी वाचवून दाखवून, त्यावर आपल्याला काम करावे लागणार असल्याचे सांगितले. अण्णासाहेब खंदारे, वाहेद खान, सय्यद जुबेर, बळीराम लोंढे यांच्यासह अन्य जणांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सय्यद अमजद, ॲड. शेख आसमा, मनीष बल्लार यांचीही यावेळी उपस्थिती होेती.