मेंडक्याचे वादग्रस्त सरपंच गेले जेलमध्ये
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:57+5:302015-02-15T22:36:57+5:30
शौचालयाचा निधी घोटाळा भोवला, एक वर्ष फरार प्रकरणावर पडदा

मेंडक्याचे वादग्रस्त सरपंच गेले जेलमध्ये
श चालयाचा निधी घोटाळा भोवला, एक वर्ष फरार प्रकरणावर पडदामुदखेड : तालुक्यातील मेंडका ग्रामपंचायतीचे तत्कालीन वादग्रस्त सरपंच शिवचरण पारडकर हे आजपासून नांदेड जेलची हवा खायला गेले आहेत़मुदखेड पंचायत समिती अंतर्गत विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून ग्रामपंचायत क्षेत्रात विविध विकासकामे करण्यासाठी आलेले अनेक लाख रुपये कामे न करता उचलणारे तत्कालीन सरपंच शिवचरण पारडकर यांचे विरूद्ध ग्रामपंचायतमधील बालाजी जंगीलवाड, रामजी पाटील वसुरे, माजी सरपंच दासरे यांनी भोकर तालुका न्यायालयात तक्रार दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही दणका दिला आणि ग्रामसेवक, सरपंच व विस्तार अधिकारी यांच्याविरूद्ध निधी घोटाळा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी दिले होते़ अखेर पारडकर भोकर पोलिसांकडे दाखल झाले़ १२ फेब्रुवारी रोजी सरपंच फरार प्रकरणावर पडदा पडला़भोकर येथील न्यायालयातून तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले होते़ १४ रोजी पुन्हा न्यायालयात आरोपी शिवचरण पारडकर यांना हजर केले असता त्यांची रवानगी जेलमध्ये करण्याचा आदेश न्यायालयातून देण्यात आला़