लग्नानंतर तीनच महिन्याच 'त्याने' प्रियकराबरोबर लावलं पत्नीचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 12:26 IST2018-05-31T12:26:41+5:302018-05-31T12:26:41+5:30

लग्नाच्या तीनच महिन्यात त्याने पत्नीचं प्रियकराशी लग्न लावून दिलं.

Man helps wife get married to boyfriend in Kanpur | लग्नानंतर तीनच महिन्याच 'त्याने' प्रियकराबरोबर लावलं पत्नीचं लग्न

लग्नानंतर तीनच महिन्याच 'त्याने' प्रियकराबरोबर लावलं पत्नीचं लग्न

कानपूर- बॉलिवूड सिनेमा 'हम दिल दे चुके सनम' सारखी वाटणारी ही कथा आहे. सिनेमाच्या कथेप्रमाणे वाटणारी ही घटना आहे कानपूरमधील. इथल्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचं लग्न प्रियकराबरोबर लावून दिलं. विशेष म्हणजे लग्नाच्या तीनच महिन्यात त्याने पत्नीचं प्रियकराशी लग्न लावून दिलं. कानपूरमधील सनिग्वन गावातील ही घटना आहे. सुजीत असं या व्यक्तीचं नाव असून सुजीतने त्याची पत्नी शांतीचं लग्न तिचा प्रियकर रवीबरोबर लावून दिलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

19 फेब्रुवारी रोजी सुजित आणि शांतीचं लग्न झालं होतं. लग्नानंतर पंधरा दिवस शांती सासरी राहिली व त्यानंतर ती काही दिवसांसाठी माहेरी गेली. 'अनेक दिवस होऊनही शांती घरी न परतल्याने सुजितने तिला सासरी न येण्याचं कारण विचारलं. सुरूवातीला शांतीने सुजितच्या विचारणेकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर तिने घडलेल्या सर्व घटना त्याला सांगितल्या. लखनऊमधील रवी नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. पण कुटुंबीयांनी माझ्या मर्जीच्या विरोधात लग्न लावून दिलं, असं शांतीने सुजितला सांगितलं. शांतीकडून सर्व प्रकार ऐकल्यावर रवीला तिच्या आयुष्यात परत आणणार असल्याचं वचन सुजितने शांतीला दिलं. 

काही दिवसांनी सुजित शांतीचा प्रियकर रवीला भेटला. रवीनेही सुजितसमोर शांतीबरोबरच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर सुजितने शांती व रवी यांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं, तशी माहिती त्याने स्थानिक पोलिसांना दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. बुधवारी सुजित, शांती व रवी तेथिल हनुमान मंदिरात जमले व तेथे सुजितने शांती व रवीचं लग्न लावून दिलं. 
 

Web Title: Man helps wife get married to boyfriend in Kanpur