अरे देवा! लग्नाआधीच होणाऱ्या नवरीला घेऊन नवरदेव फरार; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:55 IST2023-08-15T17:54:56+5:302023-08-15T17:55:28+5:30
लग्नाआधीच एक तरुण आपल्या भावी पत्नीसोबत पळून गेला. नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं असे सांगण्यात येत आहे.

अरे देवा! लग्नाआधीच होणाऱ्या नवरीला घेऊन नवरदेव फरार; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाआधीच एक तरुण आपल्या भावी पत्नीसोबत पळून गेला. नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं असे सांगण्यात येत आहे. मुलीने आपल्यासोबत घरातील दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हे प्रकरण ऐकून पोलीसही आश्चर्यचकित झाले.
एसएचओ कौशल सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी मुलीचे लग्न मातौंध पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या तरुणाशी ठरवलं होतं. नोव्हेंबरची तारीख निश्चित झाली होती. मात्र तरुणाने आपल्या मुलीला फूस लावून आपल्यासोबत नेलं.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने घरातून दागिने, रोख रक्कम आणि तिची मार्कशीट नेली आहे. त्यांनी आपल्या मुलीचा नातेवाईकांपासून तिच्या मित्रांपर्यंत सर्व ठिकाणी शोध घेतला आहे. होणाऱ्या जावयावर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
कौशल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. ज्याच्याशी मुलीचं लग्न ठरलं होतं, तो आपल्या मुलीसह पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी दोघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्यांना शोधून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.