लग्नात DJ समोर नाचताना तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय झालं? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:55 IST2025-07-06T13:54:26+5:302025-07-06T13:55:49+5:30
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

लग्नात DJ समोर नाचताना तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय झालं? जाणून घ्या...
Odisha News: ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तुमसिंगा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कार्दिलीपाल गावात एका लग्न समारंभात नाचताना तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले. विजेचा धक्का लागून एका पाहुण्याला मृत्युमुखी पडले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृताचे नाव मंटू पलाई असे असून, ते धेंकनालमधील गुडियानाली येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी गुडियानालीहून कार्दिलीपाल गावात लग्नाची मिरवणूक जात असताना ही घटना घडली. मृत मंटू पलाई आणि इतर काही तरुण डीजेसमोर बेधुंद होऊन नाचत होते. यादरम्यान, डीजेचा ११ केव्ही हाय-व्होल्टेज वीज तारेशी संपर्क आला अन् अनेकांना जोराचा शॉक लागला. मंटू पलाईसह सर्व जखमींना तात्काळ अनलाब्रेणी ढेंकनाल जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले.
दुर्दैवाने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मंटू पलाई यांना मृत घोषित केले, तर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेमुळे लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला.