माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 12:06 IST2018-10-16T12:04:34+5:302018-10-16T12:06:24+5:30

दिल्लीतील हृयात हॉटेलबाहेरील राडा कॅमेऱ्यात कैद

a man brandishes a gun outside 5 star hotel in delhi video viral | माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल

माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्री हृयात हॉटेलच्या बाहेर एका तरुणानं चक्क बंदुकीच्या जोरावर धमकी देत शिवीगाळ केली. हा तरुण बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडेय यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्याच्या हातात असणारी पिस्तुल अगदी स्पष्ट दिसत आहे. आपल्या हातातील पिस्तुल दाखवत हा तरुण समोरील व्यक्तींना धमकी देत आहे. 




हातात पिस्तुल घेऊन धमकावणाऱ्या तरुणानं शिवीगाळ केली आहे. त्याच्यासोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी देणारा तरुण लखनऊचा असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचं नाव आशिष पांडेय असं आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपी आशिषच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालं आहे. 

Web Title: a man brandishes a gun outside 5 star hotel in delhi video viral

टॅग्स :delhiदिल्ली