साई बाबासमोर डोकं टेकवलं अन् घेतला अखेरचा श्वास; मंदिरातच आला हार्ट अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:37 IST2022-12-04T17:37:04+5:302022-12-04T17:37:28+5:30
मंदिरात साई बाबासमोर डोकं टेकवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

साई बाबासमोर डोकं टेकवलं अन् घेतला अखेरचा श्वास; मंदिरातच आला हार्ट अटॅक
मध्य प्रदेशातील कटनी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात साई बाबासमोर डोकं टेकवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पूजा करत असलेल्या या व्यक्तीने नमस्कार करताच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना गुरुवारची असून, तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश महानी नावाचा एक व्यक्ती मंदिरात देवाला प्रदक्षिणा घातली आणि नतमस्तक होण्यासाठी बसला. या यावेळी त्या व्यक्तीने डोकं टेकून पाया पडला आणि यादरम्यान त्याला हार्ट अटॅक आला. अटॅकमुळे त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या वेळेस अनेक लोक त्यांच्या जवळून गेले, परंतु सर्वांना ते पूजेत मग्न असल्याचे जाणवले. त्यांचा मृत्यू झाल्याचा कोणाच्याही लक्षात आला नाही.
एक और लाइव मौत का वीडियो आया
— Nigar Parveen (@NigarNawab) December 3, 2022
वीडियो कटनी का है, साई बाबा के मंदिर में सिर झुकाया वहीं हार्टअटैक से मौतpic.twitter.com/arBQOHIx36
बराच वेळ राजेश उठले नाही, यानंतर तिथे उपस्थित भाविकांनी मंदिराच्या पुजाऱ्याला बोलावले. पुजारी तिथे पोहोचला आणि राजेशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण राजेश उठलेच नाहीत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजेश यांना सायलेंट हार्ट अटॅक आल्याचा संशय आहे.