Jharkhand: निष्काळजीपणा! कुत्र्याने चावा घेतला म्हणून पोहोचला आरोग्य केंद्रात, अँटी रेबीजच्या ऐवजी दिली कोरोनाची लस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 11:38 AM2021-11-01T11:38:12+5:302021-11-01T11:39:04+5:30

Jharkhand: चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले.

Man administered COVID-19 vaccine instead of anti-rabies jab in Jharkhand | Jharkhand: निष्काळजीपणा! कुत्र्याने चावा घेतला म्हणून पोहोचला आरोग्य केंद्रात, अँटी रेबीजच्या ऐवजी दिली कोरोनाची लस

Jharkhand: निष्काळजीपणा! कुत्र्याने चावा घेतला म्हणून पोहोचला आरोग्य केंद्रात, अँटी रेबीजच्या ऐवजी दिली कोरोनाची लस

Next

झारखंडमधील पलामू जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाची एक घटना समोर आली आहे. दरम्यान, गेल्या शनिवारी नौदिहा गावातील एका व्यक्तीचा कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे ही व्यक्ती पाटण येथील मुख्यालय आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी आली होती. मात्र, या केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याने त्याला चुकून कोरोनाची लस दिल्याची घटना घडली. (Jharkhand: Man administered COVID-19 vaccine instead of anti-rabies jab, probe ordered)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 50 वर्षीय राजू यांना आधीच कोरोनाच्या दोन्ही लसी देण्यात आल्या आहेत. यानंतर आता आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लस देण्यात आली आहे. राजू हे अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी आरोग्य केंद्रात आले होते.

या संदर्भात पलामू विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सिव्हिल सर्जन) डॉ. अनिल कुमार यांनी ही बाब निष्काळजीपणाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'या प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. एम. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक चौकशीसाठी पाटणला जाणार आहे. या पथकामध्ये डॉ. अनुप कुमार तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM) दीपक कुमार यांचा समावेश आहे.

दरम्यान, चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले. तसेच, कोरोनाची लस दिलेल्या या रुग्णाची प्रकृती आतापर्यंत सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Man administered COVID-19 vaccine instead of anti-rabies jab in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.