शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 10:36 AM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.

नवी दिल्ली :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा सतत विरोध करताना दिसत आहेत. यातच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या (दि.12) ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर दिसणार आहेत.

कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  आहे. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांच्यासह नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कोलकातामध्ये नरेंद्र मोदी आणि ममत बॅनर्जी यांची बैठक होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, ठरलेल्या वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्यात दाखल झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांची राजभवनामध्ये बैठक होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. 

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ विविध विद्यापीठांत होत असलेली हिंसक निदर्शने व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 13 जानेवारी रोजी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. मात्र, या आयोजिलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी बहिष्कार घालणार असल्याचे समजते.

कामगार संघटनांनी गेल्या बुधवारी आयोजिलेल्या भारत बंददरम्यान पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी रेल, रास्ता रोको आंदोलन झाले. हिंसक घटनाही घडल्या. हे प्रकार बंदला समर्थन देणाऱ्या डावे पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केले असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे. डावे पक्ष व काँग्रेसने घेतलेली दुतोंडीपणाची भूमिका आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या आयोजिलेल्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केले.

(सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी)

(विरोधकांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी घालणार बहिष्कार)

(केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू)

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका