शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 8:57 AM

जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या,

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदीविरुद्ध आणि केंद्र सरकारविरुद्ध आपली भूमिका बजावतात. मात्र, मंगळवारी मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पंतप्रधानांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्याचदिवशी ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची अचानक भेट झाली. कोलकाता येथील विमानतळावरुन नवी दिल्लीकडे रवाना होण्यासाठी ममता बॅनर्जीविमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यावेळी, ममता यांना जशोदाबेन या कोलकाता विमानतळावर दिसल्या. त्याक्षणी ममता यांनी धावत जाऊन जशोदाबेन यांची भेट घेतली. यावेळी, दोघांमध्ये सुखद संवादही झाला. 

जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या, धनबादवरुन परतताना त्या कोलकाता विमानतळावर आल्या होत्या, अशी माहिती सुत्रांनी दिली. अचानकपणे झालेल्या भेटीमुळे दोघांनाही मोठा आनंद झाला. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही जशोदाबेन यांचे स्वागत केले. तसेच, जशोदाबेन यांना भेट स्वरुपात एक साडीही देण्यात आली. त्यानंतर ममत दीद दिल्लीकडे रवाना झाल्या. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पश्चिम बंगालच्या समस्या मांडणार आहे. तसेच, राज्यासाठी निधींची तरतूद करण्याची विनंतीही जशोदाबेन करणार आहेत. दरम्यान, जशोदाबेन यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील आसनसोल येथे कल्याणेश्वरी मंदिरात पूजा केली होती. आसनसोल हे धनबादपासून 65 किमी अंतरावर आहे.

टॅग्स :JashodabenजसोदाबेनMamata Banerjeeममता बॅनर्जीkolkata-uttar-pcकोलकाता उत्तरAirportविमानतळ