शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee On BJP: 'पोलिसांनी गोळी चालवली असती, पण...' ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 22:12 IST

West Bengal: पश्चिम बंगालमधील ममता सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भाजपने मंगळवारी 'नबन्ना अभियान' सुरू केले, यादरम्यान हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या.

Mamata Banerjee On BJP: पश्चिम बंगालमधील ममता सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भाजपने मंगळवारी 'नबन्ना अभियान'(Nabanna March) सुरू केले. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या निदर्शनावरून भाजपवर निशाणा साधला असून रॅलीमध्ये गुंड आणल्याचा आरोप केला आहे.

सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "13 सप्टेंबरच्या रॅलीसाठी भाजपने बंगालच्या बाहेरून सशस्त्र गुंड बोलावले होते. हिंसक भाजप आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला असता, पण सरकारने संयम बाळगला." कोलकाता उच्च न्यायालयाने नबन्ना मार्चमध्ये झालेल्या गोंधळाबाबत राज्याच्या गृहसचिवांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

नबन्ना प्रचारात गदारोळ भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारच्या विरोधात पश्चिम बंगाल सचिवालयाकडे नबन्ना मोर्चा काढला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. निषेध मोर्चादरम्यान अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

पोलिसांच्या गाडीला आगआंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. निदर्शनादरम्यान पोलिसांची गाडी जाळण्यात आली. टीएमसीचा आरोप आहे की भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोर्चादरम्यान हिंसाचाराचा अवलंब केला आणि पोलिसांचे वाहन पेटवून दिले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा