ममता बॅनर्जींना केंद्राचा Unlock 4 मान्य; तीन दिवसच पश्चिम बंगालमध्ये कडक लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 17:50 IST2020-08-31T17:49:03+5:302020-08-31T17:50:38+5:30
नवीन गाईडलाईननुसार केंद्राने 8 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार कोलकाता मेट्रो 8 सप्टेंबरपासून सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु केली जाणार आहे.

ममता बॅनर्जींना केंद्राचा Unlock 4 मान्य; तीन दिवसच पश्चिम बंगालमध्ये कडक लॉकडाऊन
पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 4 ची गाईडलाईन मान्य केली असून कवेवळ तीन दिवसच राज्य संपूर्ण बंद असणार असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये आज कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला.
नवीन गाईडलाईननुसार केंद्राने 8 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार कोलकाता मेट्रो 8 सप्टेंबरपासून सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरु केली जाणार आहे. याशिवाय राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबरला संपूर्ण लॉकडाऊन राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने, नागरिकांनाच परवानगी राहणार आहे.
West Bengal government extends lockdown till September 30. Metro rail service to resume in graded manner with effect from September 8. pic.twitter.com/twLRa3Lv5B
— ANI (@ANI) August 31, 2020
राज्यातील शाळा, कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना केंद्राने सांगितल्याप्रमाणे कोणतीही सूट देण्यात येणार नाही. तसेच सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क आदी बंद राहणार आहेत. मात्र, केंद्राने सांगितल्याप्रमाणे कंटेनमेंट क्षेत्राबाहेरील ओपन एअर थिएटर 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. मात्र, यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा घरातूनच ऑनलाईन; अभ्यासाला महिनाभराचा वेळ : उदय सामंत