Mamama Banerjee On Ram Navami: 'रमजान सुरू आहे; राम नवमीची मिरवणूक काढा, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 13:24 IST2023-03-30T13:23:01+5:302023-03-30T13:24:28+5:30
Mamama Banerjee On Ram Navami: आज संपूर्ण देशात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Mamama Banerjee On Ram Navami: 'रमजान सुरू आहे; राम नवमीची मिरवणूक काढा, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
Mamama Banerjee On Ram Navami: आज राम नवमी आहे. संपूर्ण देशात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाजपने पश्चिम बंगालमध्येही यंदा रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्याची तयारी केली आहे. यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इशारा दिला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'काही लोकांनी रामनवमीच्या दिवशी शस्त्रे घेऊन मिरवणूक काढू, असे म्हटले आहे. मी रामनवमीची मिरवणूक थांबवणार नाही, पण शस्त्रे दिसली तर सरकारकडून कारवाई केली जाईल. रमजानचा महिनाही सुरू आहे, त्यामुळे या काळात कोणी चुकीचे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडले जाणार नाही, दंगल करण्याचा अधिकार कोणालाही नाही,' असा अशारा त्यांनी यावेली दिला.
भाजपची भव्य मिरवणूक
भाजपने पश्चिम बंगालमध्ये रामनवमीची मोठी तयारी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुबेंद्रू अधिकारी म्हणाले होते की, गुरुवारी एक कोटी राम भक्त पश्चिम बंगालच्या रस्त्यावर उतरतील. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी हिंदूविरोधी असल्याचा आरोप करत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे हिंदू प्रेम खोटे आहे. ममता बॅनर्जी भाजप अध्यक्षांना गंगा आरती करण्यापासून रोखतात आणि नंतर स्वतः गंगा आरती करुन खोटे प्रेम दाखवतात. ईदच्या दोन दिवसांच्या सुट्टीवरही त्यांच्यावर निशाणा साधला असून रामनवमीला सुट्टी दिली नसल्याचे म्हटले.